मध्यमवर्गीय माणूस ह्या लॉकडाऊन मधे पिसला जातोय. गरीब तोंड उघडून बोलू शकतो. श्रीमंत घेणं देणं नसल्यासारखा वागू शकतो. पण मध्यम वर्गीय माणसाची अवस्था “न थुकते बनता है ना निगलते” अशी झालीये.
ह्या सगळ्यात एक केटेगरी म्हणजे व्याजाने पैसे घेऊन कामधंदा किंवा गरज भागवणारी. ह्या लॉकडाऊन मधे त्यांचे हाल कुत्र खाईना अशी झाली. काम बंद झालं हातात खेळतं भांडवल नाही, सरकार ने कर्ज हप्त्याना तीन महिने स्थगिती तर दिली.. पण ज्यानी प्रायव्हेट कर्ज,व्याजी पैसे घेतलेत त्यांचं काय ?? त्यानी आपलं दु:ख कोणाला सांगावं.त्यानी काय करायचं. सावकार मंडळी तर सर्रास पैसे हप्ते दंड वसूलतायेत. कसलाही विचार न करता. जणू त्याना काहीच फरक पडत नाही. त्यांची दादागिरी चालताना दिसतीये. कसलीच तमा बाळगली जात नाहीये. ह्या बाबतीत सरकारने पावलं उचलली पाहिजेत. खायला काही नसताना ह्या लोकांना पैसे द्यावेच लागतायेत. हाताला काम नाही. नोकरी आहे पण पगार नाही. अजून किती दिवस हे असं चालणार. व्याज वाल्या लोकांमुळे लोकाना पुढे मार्ग सापडेनासा झालाय. मिळेल तो पैसा त्यांच्या घशात घालावा लागतोय.पैसे वसूलीच्या नादात एखाद्याचा जीव धोक्यात आला तर ह्याला जबाबदार कोण.??
