“आई” म्हणलं की पहिली इमेज डोळ्यासमोर येते ती प्रेमळ, काळजी घेणारी, समजून घेणारी, पण अशी आई नसली तर.. तर म्हणाल अशी आई नसली तर ती सावत्रच असू शकते. पण नाही सख्खी आई सुद्दा कधी कधी स्वार्थी असू शकते. (गोष्टीतल्या पात्रांची नावं बदलली आहेत) समीरा.. तसं तर ती दोन भावानां एकुलती एक बहिण. दोघेही भाऊ उच्चशिक्षित. तसं पहायला गेलं तर तीची आई अतिशय कष्टाळू. मुलाना मोठं करण्यात तीचा खूप मोठा वाटा. पण अचानक असं काही घडलं की तीला खूप मोठं व्हायचं खूप पैसे जमीन जुमल्याची लालसा झाली. एक मुलगा परदेशी स्थाईक. अधून मधून बहिणीला मदत करायचा. दुसरा ही त्याच्यापरीने करायचा.पण करण्यापेक्षा जास्त त्याची परतफेड टोचून बोलून करून घ्यायचा. भाच्याना कमी लेखताना जरा ही काटकसर नसायची. अंथरूण पाहून पाय पसरायचा सल्ला दिला जायचा.असो.. तर एक दिवस समीराच्या आईच्या मनात आलं की आपल्याला शेती असावी..पण स्वस्तात कुठे काम होईना मग काय करायचं.. मुलीच्या सासरची शेतीवाडी. त्यातून आपल्याला मिळावी ह्यासाठी समीरा वर दबाव टाकणं सुरू झालं. खोटं बोलून तीला इमोशनली ब्लैकमैल ही केलं. ती दाद देत नाही म्हणल्यावर तीच्या नवरयाला थेट विचारलं. एक वर्षासाठी शेतजमीन दाखवण्यापुरती नावावर करायला सांगितली. त्याने विचार केला एक वर्षासाठीच हवीये. आपल्या मुलांसाठी लांबचा विचार करून त्याने वडीलाना राजी केलं. दगा फटक्याचा विचार न करता त्यानीही स्वीकृती दिली. झालं जमीन नावावर झाली समीराची आई परदेशी निघून गेली. तीन वर्ष झाली तरी परतबोलीची भाषा न करणारे तीघे.. समीराने थेट सवाल केला. जमीन परत देण्याबद्दल. पण परदेशी असलेल्या भावाने हात वर केले. डोळे मिटून घेतले. त्याच्या म्हण्ण्यानुसार जमीन देण्याचे कारण वेळो वेळी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून ती समीराने त्याना दिली होती.. तीने खूप सांगितलं त्यावर त्याने एकच सांगितलं ‘आमचे पैसे दे आणि जमीन परत घे.’ आठ वर्षानी हाच मुद्दा पुन्हा उपस्थित केला समीराच्या नवरयाने. ‘मी तुम्हाला घेतलेली रक्कम परत देतो मला माझी जमीन परत द्यावी’. मेव्हणा नकळत बोलून गेला. ‘मला काय करायची आहे जमीन. तुमच्या अडीनडीच्या काळात मुलीच्या लग्नासाठी लागत असेल तर मी परत देतो. मला अडवणूक करायची नाहीये’. पण दोन दिवसानी त्याने समीराच्या आईशी चर्चा करून आपलं वाक्य बदललं. कारण समीराच्या आईला जमीन हातची जाऊ द्यायची नव्हती. म्हणाला मी नाही देऊ शकत. तुमच्या वडीलानी मला ती जमीन स्वखुशीने दिली होती. तुमच्या वागण्याला कंटाळून. समीराचं तीच्या कुटूंबाचं पैसे उत्पन्न एकमेव असलेलं साधन सुद्दा तीच्याच लोकांनी हिसकावून घेतलं. ज्याने हे करायला भाग पाडलं आज तो अवाक्षर ही काढत नाहीये. सासरच्या लोकानी तीच्यावर माहेर भरल्याचा ठपका ठेवलाय. इतका पैशाचा हाव असू शकतो. पैसा प्रॉपर्टी वाढवण्याच्या नादात आपण आपल्याच मुलीचं नातवंडांचं आयुष्य उध्वस्त केल्याची जाणिव ही झाली नाही एका आईला. तीला तीच्या मुलीचे दुःख ही दिसत नाहीये. पश्चातापाचा लवलेशही नाही. मुलीला देताना ऐकलं असेल पण मुलीच्या सासरकडून उकळणारी ही पहिलीच आई असेल.
खोटी नाती
Published